महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १७ मार्च । राजस्थान आणि गुजरात मध्ये हवामान खात्यानं उष्ण लहरीचा अंदाज व्यक्त केला आहे.18 मार्च पर्यंत तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भ, महाराष्ट्राचे तापमान 41 ते 42 डिग्री पर्यंत पुढील चार ते पाच दिवस राहणार आहे. ती उष्ण लहर ठरेल.
अचानक वाढलेलं हे तापमान आरोग्यासाठी धोक्याचं आहे. मार्च महिन्याचा हा दुसरा आठवडा. विदर्भातील तापमान अचानक वाढलं आहे. विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रात तापमान वाढ चालू झाली आहे. पुढील काही दिवसात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे.
अजूनही रात्री आपल्याकडे थंडी जाणवते आहे. रात्रीची थंडी आणि दिवसा उष्णता हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यावर्षी जागतिक हवामान खात्यानं उष्ण लहरीचा धोका व्यक्त केला आहे. त्यामुळे येणारं वर्ष अन पुढचे काही वर्ष अतिशय उष्णतेचे असणार आहेत , असे प्रा.सुरेश चोपणे म्हणालेत.