पंजाबचे CM भगवंत मान यांनी घेतला पहिलाच मोठा निर्णय ; भ्रष्टाचार मुक्त पंजाब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या (AAP) दणदणीत विजयानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान (CM Bhagwant Mann) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज त्यांनी घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाने भ्रष्टाचाऱ्यांची आता खैर नाही. पंजाबमधील भ्रष्टाचार संपवण्यासाठी भगवंत मान अँटी करप्शन हेल्पलाइन सुरु करणार आहेत. (Anti Corruption Helpline Number)

भ्रष्टाचार मुक्त पंजाब
पंजाबमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अँटी करप्शन हेल्पलाइन जारी करण्यात येणार असल्याचे सीएम मान यांनी आज सांगितलं. ही हेल्पलाइन भगतसिंग यांच्या हुतात्मा दिनी जारी केली जाणार आहे. हेल्पलाइन जारी झाल्यानंतर पंजाबमधील लोक व्हॉट्सअॅपवर भ्रष्टाचाराच्या तक्रारी पाठवू शकतील.

थेट मुख्यमंत्र्यांकडेच करता येणार तक्रार
पंजाबमधील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या तक्रारी या हेल्पलाइनद्वारे थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यापर्यंत पोहचतील. अँटी करप्शन हेल्पलाइनबाबत माहिती देताना सीएम मान म्हणाले की, 99% लोक प्रामाणिक असतात पण 1 टक्क भ्रष्ट लोकांमुळे संपूर्ण यंत्रणा बिघडते. आपण नेहमी प्रामाणिक लोकांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्वात आधी हफ्ता वसूली थांबवली जाईल, वसुलीसाठी कोणताही नेता कोणत्याही अधिकाऱ्याला यापुढे त्रास देणार नाही, असं पंजाबचे नवे मुख्यमंत्री मान यांनी जाहीर केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *