महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१७ मार्च । कोरोनाचं धास्ती आता फारशी राहिली नसली, तरिही कोरोना नियम (Corona Guidelines) पाळणं हे आजही गरजेचं आहे. होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) नियमावली जारी करत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गेली दोन वर्ष होळी साजरी करताना कोरोनाचं संक्रमण (Corona Outbreak) मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे कडक निर्बंध या सणाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आले होते. दरम्यान, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं खबरदारी बाळगण्याची गरज नियमावली जारी करत व्यक्त केली आहे. सण समारंभ साजरे करताना पुन्हा कोरोनाचं संक्रमण वाढू नये, यासाठी प्रत्येकानं काळजी घेण्याची गरज आहेत. त्या अनुशंगानं अनावश्यक गर्दी टाळण्यासोबत रंग खेळण्याबातत सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सरकारनं जारी केलेल्या सूचना खालीलप्रमाणे
>> कोरोना मार्गदर्शन नियमांचं सगळ्यांनी पालन करावं.
>> कोरोना संक्रमाणामुळे शक्यतो गर्दी न करता होळी/शिमगा साजारा करावा.
>> राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नका.
>> मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा-सुव्यस्थेचं पालन करणं बंधनकारक, रात्री 10 च्या आत होळी साजरी करा.
>> होळी सणानिमित्त वृक्षतोड करु नका, वृक्षतोड आढळून आल्यास कायदेशीर कारवाई होणार
>> धुलिवंदन सणाच्या निमित्तानं एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते. मात्र कोरोनाचं संक्रमण वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत.
>> होळी/शिमगा सणाच्या निमित्तानं विशेष करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. पण यावर्थी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंधिरातच दर्शनाची व्यवस्था होईल, अशा उपाययोजना कराव्यात. तसंत मंदिरात गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
>> कोविड अनुरुप वर्तणूक नियमांचं तंतोतंत पालन होईल, या अनुशंगानं सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी.
>> होळी, धुलिवंदन आणि रंगमचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन किंवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन सण साजरे करावेत.