Remedies to Darken Beard: काही घरगुती उपाय जे तुमची दाढी-मिशीचे केस काळेभोर बनवतील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । आज तुम्‍हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यांचा वापर करून तुम्‍ही तुमची दाढी-मिशी काळी (Remedies to Darken Beard) करू शकता. तेही कोणत्याही साइड इफेक्टशिवाय. जाणून घेऊया त्या पद्धती कोणत्या आहेत. याबाबत ‘झी न्यूज’ने बातमी दिली आहे.

पुदिन्याची पानं आहेत फायदेशीर ; पुदिन्याच्या पानांची पेस्ट बनवा आणि त्यात 2 चमचे कांद्याचा रस मिसळा. त्यानंतर तो रस पांढऱ्या दाढीवर लावा. काही दिवसातच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल आणि तुमच्या दाढी-मिशीचे पांढरे केस पुन्हा काळे होऊ लागतील.

गायीच्या दुधापासून बनलेलं लोणी ; साइड इफेक्ट्सशिवाय दाढी आणि मिशी काळी करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे गायीच्या दुधापासून बनवलेलं लोणी. रोज सकाळ संध्याकाळ या लोण्यानं तुमच्या दाढी-मिशांना मालिश करा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसू लागेल आणि तुमची दाढी-मिशी पुन्हा काळी होऊ लागेल.

कच्च्या पपईचे फायदे ; कच्ची पपई दाढी आणि मिशी काळी करण्यासाठी एक उत्तम पर्याय मानला जातो. कच्ची पपई बारीक करून पेस्ट बनवा. ही पेस्ट अर्धी वाटी भरून घ्या. यात 1 चिमूट हळद आणि 1 चमचा कोरफड जेल घाला. ही पेस्ट दिवसातून 3 वेळा दाढी आणि मिशांवर लावा. लवकरच तुम्हाला बदल जाणवेल.

दही आणि खोबरेल तेल फायदेशीर ; घराच्या स्वयंपाकघरात सहजपणे उपलब्ध असलेलं दही आणि खोबरेल तेल देखील फायदेशीर औषध मानलं जातं. या दोन्हींचं मिश्रण तयार करा. हे मिश्रण सकाळ-संध्याकाळ दाढी आणि मिशीवर लावा. काही दिवसांनी तुमचे केस काळे होऊ लागतील.

आवळा दाढी-मिशी काळी करण्यासाठी उपयुक्त ; जीवनसत्त्वांचा एक चांगला स्रोत मानला जाणारा आवळा तुम्ही केसांचा रंग पुन्हा काळा करण्यासाठी वापरू शकता. आवळा बारीक करून रात्रभर लोखंडाच्या भांड्यात ठेवा. त्यानंतर सकाळी दाढी आणि मिशीवर (Beard and Mustache) लावा. यामुळं तुमचे केस काळे होतील. रोज रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्यानं तुम्हाला फरक दिसू लागेल.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *