पद्म पुरस्कार घेण्यासाठी आलेले 126 वर्षीय स्वामी शिवानंद ; PM मोदींसमोर नतमस्तक , मोदींनी देखील वाकून शिवानंद यांना प्रणाम केला VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२२ मार्च । अलीकडेच पद्मश्री पुरस्कारांची (Padmashri Award) घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल अनेकांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात वाराणसीचे योगगुरू 126 वर्षीय स्वामी शिवानंद (Swami Shivanand) देखील अनवाणी पायाने पोहोचले होते. पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद हे PM नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यापुढे नतमस्तक झाले आहेत. यावेळी मोदींनी देखील खाली वाकून शिवानंद यांना प्रणाम केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल (Viral Video) होतं आहे.

126 वर्षीय स्वामी शिवानंद पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी अनवाणी पायाने पोहोचले होते. त्यांच्या राहणीमानातील साधेपणाचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. मोदींना प्रणाम केल्यानंतर पद्म पुरस्कार घेण्यापूर्वी ते राष्ट्रपती कोविंद यांच्यापुढे देखील ते गुडघ्यावर टेकले होते. स्वामी शिवानंद यांना समोर झुकलेलं पाहून राष्ट्रपती कोविंद देखील आपल्या आसनावरून उठून पुढे आले. यावेळी त्यांनी स्वत: शिवानंद यांना पकडून उठवलं. आणि पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

स्वामी शिवानंद यांच्या नम्रपणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. एका आयपीएस अधिकाऱ्यांनी लिहिलं की, ‘126 वर्षांचे योग गुरू स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपलं संपूर्ण जीवन योगासाठी समर्पित केलं आहे. तसेच त्यांच्या स्वाभावतला नम्रपणा सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. जिथे योगाची उत्पत्ती झाली, त्याच भूमीवर आमचा जन्म झाला, याचा आम्हाला अभिमान आहे’, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

स्वामी शिवानंद यांचा जन्म 8 ऑगस्ट 1896 रोजी झाला आहे. ते सध्या 126 वर्षांचे असूनही देखील कोणत्याही आधाराशिवाय स्वत:च्या पायावर उभे आहेत. अजूनही ते एखाद्या किशोनवयीन तरुणाप्रमाणे तंदुरुस्त आहेत. त्यांनी आपलं सर्व जीवन योग साधनेसाठी समर्पित केलं होतं. याचाच सन्मान म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *