धोनीने अचानक सोडले कर्णधारपद; ६ वेळा बनवलंय CSK ला चॅम्पियन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मार्च । जगज्जेता कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा अचानक राजीनामा दिला आहे. आयपीएल २०२२ ला सुरुवात होण्याला दोन दिवस शिल्लक असताना त्याने हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार असणार आहे.

धोनी २००८ च्या पहिल्या सत्रापासून ते २०२१ च्या हंगामापर्यंत सीएसके (CSK) चा कर्णधार होता. मध्यंतरी चेन्नई सुपर किंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. तेव्हा धोनीने एका हंगामात रायझिंग पुणे सुपरजायंटचे नेतृत्व केले होते. आतापर्यंत आयपीएलच्या १४ पैकी १३ हंगामात धोनीने कर्णधारपद भूषविले आहे. आतापर्यंत धोनीने चेन्नई संघाला ६ वेळा चॅम्पियन बनवले आहे.

– महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये २०४ सामन्यांत नेतृत्व केले, ज्यापैकी त्याने १२१ सामने जिंकले. तर ८२ सामन्यांत त्याला पराभवाचा सामना करावा लागला. धोनीची विजयाची टक्केवारी ५९.६० आहे.

– धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने ९ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला, तर संघ ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

– धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ४ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. तसेच २ वेळा चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही त्याने चेन्नईला मिळवून दिले आहे.

– चेन्नईचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी २००७ नंतर पहिल्यांदाच कर्णधारपदाशिवाय खेळताना दिसणार आहे. आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत धोनीने टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक, टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *