महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; वुहान इथे वेई गुझियान या महिलेच्या रूपात कोरोनाचा पहिला रुग्ण 10 डिसेंबर 2019 रोजी समोर आला. अर्थात, हा विषाणू काय भानगड आहे, हे तोवर जगाला माहितीही नव्हते. 10 जानेवारी 2020 रोजी त्याची जगाला ओळख झाली…आणि बघता बघता 199 देशांत म्हणजेच जगभरात त्याचा प्रादुर्भाव झाला. एक कोटी 10 लाख लोकसंख्या असलेल्या वुहानमधून निघालेला हा विषाणू जगभरातील 700 कोटींहून अधिक लोकसंख्येला मारक ठरतो आहे. फेब्रुवारीपर्यंत हा विषाणू तसा चीनचाच होता आणि मार्च उजाडताना तो सगळ्या जगाचा झाला… अवघे विश्व आता या विषाणूच्या विळख्यात आहे!
चीनच्या वुहान शहरात 10 डिसेंबर 2019 रोजी वेई गुझियान या महिलेला पहिल्यांदा कोरोनाची बाधा (झीरो पेशंट)
29 फेब्रुवारीपर्यंत जगभरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 86 हजार 600 होती. त्यात 80 हजार एकट्या चीनमध्ये.
29 फेब्रुवारीनंतर 31 मार्चपर्यंत चीनमध्ये रुग्णांची संख्या वाढली 1500 ने… आणि याच कालावधीत जगभरात 8 लाख 58 हजारांहून जास्त नवे रुग्ण.
गेल्या महिन्यात चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अवघी 2 टक्क्यांची वाढ होती.
इटली, स्पेन, अमेरिकेसह उर्वरित जगामध्ये याच कालावधीत रुग्णसंख्येत 870 टक्क्यांनी वाढ.
गुरुवारी सकाळपर्यंत जगभरात 47 हजार 205 मृत्यू, संक्रमितांचा आकडा 9 लाख 35 हजारांवर