‘सत्ता पाहिजे ना, सगळ्या समोर सांगतो, मी येतो तुमच्यासोबत पण…’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । ‘ सत्ता पाहिजे ना. मी सगळ्या समोर सांगतो. मी येतो तुमच्यासोबत, पण तुम्ही जे चाळे केले आहेत. कुटुंबीयांची बदनामी करता ना. आम्ही तुमच्या कुटुंबीयांची बदनामी केली का? एवढाच तुमचा जीव जळत असले तर मला टाका तुरुंगात, मर्द असाल तर मर्दासारखे लढा, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात (Budget session maharashtra 2022) आज निवेदन सादर करत विरोधी पक्षांच्या आक्षेपांना जशास तसे उत्तर दिली.

‘आम्ही सगळे भ्रष्टाचारी आहोत, दाऊदची माणसं आहोत मग सकाळच्या सत्तेचा प्रयत्न सफल झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले नसते का? आम्ही जर तुमच्या कुटुंबात पट्टा बांधला तर आमच्या कुटुंबाची बदनामी करता जी नीच आणि निंदनीय आहे. मर्द असाल तर या मर्दासारखा अंगावर, सत्तेचा दुरउपयोग करून समोर येतात. शीखंडीला लढण्याची ताकद नव्हती, त्याला मध्ये टाकलं. आता शीखंडी कोण आहे आणि मर्द कोण आहे, हेच कळत नाही. कोण कुणाच्या मागून लढत आहे. हिंमत असेल तर समोरासमोर या, नामर्दासारखे लढू नका. यंत्रणा वापरायच्या कुटुंबीयांना बदनाम करायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘हा महाराष्ट्र आहे. धृतराष्ट्र नाही. मी घाबरलो म्हणून बोलत नाही. यातून काहीच होणार नाही. ही संधी आहे, संधीचं सोनं करण्याचे काम आहे. काही सुचना असतील सांगा, कोण गुन्हेगार असेल तर सांगा आम्ही कारवाई करू. पण तुम्हाला सत्ता हवी आहे, म्हणून तुम्ही कुटुंबाला तणावात आणाचे, जामीन मिळू द्यायचा नाही, तुम्हाला सत्ता हवी आहे ना. चला सगळ्यासमोर सांगतो, मी तुमच्यासोबत आहे. उगाच पेनड्राईव्ह गोळा करू नका, पेन ड्राईव्हची गरज नाही. मी तुमच्यासोबत येतो. माझ्याशी वाद आहे ना मग मला तुरुंगात टाका. कुटुंबाशी कुणी बदनामी केली का, मला तुरुंगात टाका. खुलासे करून उपयोग नाही. त्याचे शकुन याला, त्याचे शकून याला. कोर्टात सादर केले जाते. जर एवढाच जीव जात असेल तर मला तुरुंगात टाका मी तयार आहे’ असंही उद्धव ठाकरेंनी सुनावलं.

‘मी भावनिक होऊन सांगतो, आर्थर रोड म्हणत नाही. बाबरीच्या खाली रामजन्मभूमी होती तसं कृष्णभूमीचा शोध लागला असेल तर त्या तरुंगात टाका. मी कृष्णाचा अवतार नाही. मला देवकीच्या तुरुंगात टाका. पण तुम्ही कंसात जाऊ नका. मी सातव्या श्रीकृष्णाची वाट पाहीन.

बाळासाहेबांना काय उत्तर देणार? असं विचारताय मग बाळासाहेबांनी तुमच्या नेत्याला वाचवलं. ते जर गेले तर बाळासाहेबांना काय उत्तर देणार. अवघा देश सोबत नव्हता तेव्हा बाळासाहेब एकटे बोलले होते, त्यांना तिथेच राहु द्या. २०१४ ला हिंदूच होतो, आजही हिंदूच आहे. तुरुंगात टाकत असाल तर मला टाका. तुरुंगात टाकणार असणार तर माझ्या शिवसैनिकांची मी जबाबदारी घेतो’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *