PAK vs AUS, 3rd Test : २४ वर्षांनंतर आले अन् पाकिस्तानचे कंबरडे मोडले ; ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । Pakistan vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या ३५१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान पाकिस्तानने नांगी टाकली. १९९८नंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने इतिहासाची पुनरावृत्ती करताना तीन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली. रावळपिंडी व कराची कसोटी ड्रॉ राहिल्यानंतर तिसऱ्या कसोटीत निकालाची सर्वांना अपेक्षा होती. पण, तो निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागेल असे कुणालाही वाटले नव्हते. कर्णधार बाबर आजम खेळपट्टीवर असेपर्यंत पाकिस्तानी चाहत्यांना आस लागून राहिली होती. पण, नॅथन लियॉनच्या ( Nathan Lyon) फिरकीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले.

वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. त्यात वॉर्नरने ५१ धावा केल्या, तर ख्वाजाने १०४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ३ बाद २२७ धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर विजयासाठी ३५१ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ५ फलंदाज १६७ धावांवर गमावले आहेत. इमाम-उल-हक ७० धावा करून माघारी परतला. अब्दुल्लाह शफिक ( २७), अझर अली ( १७), फवाद आलम ( ११), मोहम्मद रिझवान ( ०) हे अपयशी ठरले. पॅट कमिन्स व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत.

कर्णधार बाबर आजम व साजिद खान यांनी पाकिस्तानचा संघर्ष सुरू ठेवला होता, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर स्टीव्ह स्मिथने स्लीपमध्ये भारी कॅच घेतला. बाबर १०४ चेंडूंचा सामना करून ५५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर मिचेल स्टार्कने पाकिस्तानला सातवा धक्का देताना साजिदला २१ धावांवर बाद केले. नॅथनने डावातील चौथी विकेट ही हसन अलीची ( १३) घेतली. शाहिन शाह आफ्रिदीचा अफलातून झेल स्वेप्सनने टीपला आणि नॅथनने डावात पाच विकेट्सचा टप्पा ओलांडला. स्वेप्सनने कॅच घेतल्यानंतर शाहिनच्या सेलिब्रेशनची कॉपी केली.

या दौऱ्यावर दुसऱ्यांदा आणि कसोटी कारकीर्दितील १९वेळा नॅथनने डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत. पॅट कमिन्सने अखेरची विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांनी विजय पक्का केला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ २३५ धावांवर तंबूत परतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *