महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । उत्तर प्रदेश विधानसभेत पूर्ण बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इकना स्टेडियमवर पार पडला. योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
Lucknow | BJP's Yogi Adityanath takes oath as the Chief Minister of Uttar Pradesh for the second consecutive term. pic.twitter.com/ubAZ5nHTB4
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 25, 2022
योगी सरकारमध्ये केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ब्रजेश पाठक हे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. याचबरोबर, सुरेश कुमार खन्ना यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सूर्य प्रताप शाही, स्वतंत्र देव सिंह, बेबी रानी मौर्य, चौधरी लक्ष्मीनारायण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. भुपेंद्र सिंह चौधरी, अनिल राजभोर, जितेन प्रसाद, राकेश साचेन, जयवीर सिंह, धरम पाल सिंह, नांद गोपाल गुप्ता यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.