महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ मार्च । आयपीएल सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण आता कर्णधारपद सोडल्यावर धोनी आयपीएल खेळणार की नाही, याबाबतची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारताच्या एका क्रिकेटपटूने धोनीच्या खेळण्याबाबत मोठे भाष्य केले आहे.
गेल्यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. त्यावेळी धोनीने आपल्या मुलाखतीमध्ये काही गोष्ट स्पष्ट केल्या होत्या.
the final words of MS the captain ❤️
pic.twitter.com/skOnAgYRwY— riya (@reaadubey) March 24, 2022
धोनीने म्हटले होते की, ” आयपीेल सुरु झाल्यापासून चेन्नईच्या खेळाडूंच्या संचात मोठा बदल झालेला नाही. पण आता यापुढे चेन्नईच्या संघातील काही गोष्टी बदलतील. चेन्नईचा नवीन राजा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर काही जुने खेळाडू कदाचित संघाबरोबर नसतील, तर काही नवीन खेळाडू संघामध्ये दाखल होतील.” हे सांगतानाच आपण पुढच्यावर्षी चेन्नईचे कर्णधार नसणार, हे धोनीने स्पष्ट केले होते. पण त्याचबरोबर आपण कर्णधार नसलो तरी संघात मात्र कायम असणार आहे, हे धोनीने सांगितले. पण धोनी आता जास्त वर्षे संघात राहणार नसल्याचेही स्पष्टपणे समोर आले आहे. पण धोनी यावर्षी तरी नक्कीच आयपीएल खेळणार आहे, पण पुढच्यावर्षी तो आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून असेल की नाही, याबाबत सांगता येणार नाही. त्यामुळे धोनीसाठी एक खेळाडू म्हणून ही अखेरची आयपीएल असणार आहे.