![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२६ मार्च । मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात केमिकल टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला असून एक्सप्रेसवेवर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या लांबच लांग रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर केमकील सांडल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ केमिकल टँकर पलटी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक केमिकल टँकर पलटी झाल्याने त्यामधून केमिकल वाहू लागले. रस्त्यावर केमिकल पसरल्याने अनेक वाहन घसरू लागली. दोन अवजड वाहन तर झाली. बोरघाटमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प होती. त्यानंतर आता ती लोणावळामार्गे वळवण्यात आली आहे. पुण्याकडील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.