33 वर्षांनंतरही ‘रामायण’ची जादू कायम, पुन्हा रचला अनोखा इतिहास; नंबर वन शो

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात प्रेक्षकांची मागणी लक्षात घेता दूरदर्शनने ‘रामायण’ व ‘महाभारत’ सारख्या मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात खास लोकांच्या मनोरंजनासाठी हा निर्णय घेण्यात आला आणि आता त्याचे परिणाम समोर आहे. होय, रामायण या मालिकेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रेम मिळत असल्याचे चित्र आहे.

टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना पछाडत, टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

सध्या तरी रामायणला टक्कर देणारा अन्य कुठलाही शो कुठेही नाही. गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2015 पासून आत्तापर्यंत जनरल एंटरटेनमेंट श्रेणीत रामायण बेस्ट शो ठरला आहे. प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी ट्विटरवर याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *