प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेसाठी अशा प्रकारे कराल रजिस्ट्रेशन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । केंद्र सरकारकडून देशातील दुर्बल घटक, महिला आणि इतर घटकांच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात येतात. ज्या प्रकारे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठीही अशी एक विशेष योजना असून त्यामाध्यमातून त्यांना 6000 रुपये आर्थिक मदत मिळण्याची व्यवस्था केली जाते. या योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना (PMMVY Scheme) असे आहे.

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही योजना केंद्र सरकारने केवळ महिलांसाठी राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना 6000 रुपये मिळतात. गर्भवती असलेल्या तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत म्हणून 1 जानेवारी 2017 साली ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला प्रधानमंत्री गर्भावस्था सहाय्यता योजना या नावानेही ओळखले जाते. या योजनेसाठी गर्भवती महिला अर्ज करु शकतात.

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आई-वडिलांचे आधार कार्ड
आई-वडिलांचे ओळखपत्र
मुलाच्या जन्माचे प्रमाणपत्र
बँक खात्याचे पासबुक
या योजनेचा उद्देश हा आई आणि मुल या दोघांची काळजी घेणे हा आहे. केंद्र सरकारकडून यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन टप्प्यात ही मदत दिली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये 1000 रुपये तर दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये देण्यात येतात. तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये देण्यात येतात. मुलाचा जन्म झाल्यानंतर 1000 रुपये देण्यात येतात.

पीएम मातृत्व वंदन योजना (PMMVY Scheme) या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या वेबसाईटला भेट द्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *