आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना मिळणार ‘बूस्टर डोस’ ? केंद्रात घडामोडींना वेग

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । कोरोनामुळे मार्च 2020 पासून बंद असलेली आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा आजपासून केंद्र सरकारने पुन्हा कार्यान्वित केली आहे. पहिल्या टप्प्यात १०० विमानांच्या उड्डाणाची यादी देखील जाहीर झाली. मात्र, भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणखी एक पाऊल उचलण्याचा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाने पाठवल्याची माहिती मिळत आहे. (Booster Dose to International Travelers)

यानुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी कोविड लसीचा ‘बूस्टर डोस’ देण्याचा विचार सुरू आहे. प्रामुख्याने परदेशात जाणाऱ्या आणि भारतात परतणाऱ्यां नागरिकांसाठी हा डोस उपलब्ध असणार आहे. (Health ministry of India considering to give booster dose for Indians who travelling abroad)

आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांचं कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी हा बूस्टर डोस लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. आता सध्या हा बूस्टर डोस फक्त आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील लोकांना देण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या भारतीयांना मोफत बूस्टर डोस द्यायचा की त्यांच्याकडून त्यासाठी शुल्क आकारायचे, यावरही चर्चा सुरू आहे.

बूस्टर डोसची सध्या खूप चर्चा सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसापूर्वी म्हटलं होतं की काही देश बूस्टर डोसच्या अभावामुळे भारतीयांवर प्रवास करण्यास निर्बंध लादत होते. यावरून आता केंद्र सरकार आणखी एक लस देण्याचा विचार करत आहे.

भारतात आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर परदेशी विमान कंपन्यांनी प्रवाशांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत भारतात, कोरोना लसीचे एकूण 183 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *