पिंपरी – चिंचवड ; दर रविवारची पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेची साप्ताहिक पुजा माता – भगिनींच्या हस्ते श्री दिपक भोजने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । पिंपरी (मोरवाडी) । येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे गेली साडे सहा वर्षांपासून अखंडित पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेची पुजा श्री दिपक भोजने यांच्या पुढाकाराने व समाज बांधवांच्या सहकार्याने होत आहे आज दि.२७\३\२०२२ पासुन महिन्याच्या शेवटच्या रविवारी माता भगिनींच्या हस्ते पुजन करण्यात येणार आहे आज सौ. रसिका गजानन ठोंबरे या भगिनींच्या हस्ते पुजन करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना महिला भगिनी म्हणाल्या दर रविवारची साप्ताहिक पुजा हा चांगला उपक्रम दिपकभाऊ भोजने यांनी राबवला व आम्हा महिलांना दर महिन्याचा शेवटच्या रविवारी महिलेच्या हस्ते पुजन करणार ही चांगली कल्पना आहे या निमित्ताने समाज भगिनी एकत्र येतील यावेळी सौ. सुरेखा विजय महानवर सौ. रेणुका दिपक भोजने सौ. ललिता योगेश हुगे सौ. सोनाली किसन फसके सौ. संगीता निलेश हुगे समाजिक कार्यकर्त्या सौ. रोहिणी रासकर व श्री शंकर दातीर श्री विजय महानवर श्री किसन फसके श्री गजानन ठोंबरे श्री बंडू लोखंडे समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होते श्री दिपक भोजने यांनी प्रास्ताविक करताना दर रविवारच्या साप्ताहिक पुजेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम महिला दिन , डाॅक्टर डे , नर्स डे , समाज बांधवांचे वाढदिवस , साप्ताहिक पुजा वर्धापनदिन यांचे आयोजन करण्यात येते महिला भगिनींच्या हस्ते पुजनाच्या वेळी ज्यास्तीत ज्यास्त महिला भगिनींनी उपस्थित राहाण्याचे अहवान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *