गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ही भेट होत आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत राज्याचे गृहसचिव आनंद लिमये आणि मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे हे सुद्धा बैठकीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारणत: 5 वाजण्याच्या सुमारास दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. राज्यातील गृहविभागाच्या कामकाजावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा बैठकील पोहोचत आहेत. महाराष्ट्रातील आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयाला शरद पवारांनी विरोध दर्शवला आहे. त्या अनुषंगाने सुद्धा या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयाला पवारांचा विरोध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईमध्ये राहण्यासाठी आमदारांना घर देण्यास विरोध केला आहे. महाविकासआघाडी सरकारच्या निर्णयाला शरद पवार यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर, विरोधी पक्षापासून सामान्य जनतेने या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असल्याने त्याला विरोध दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात कोरोना काळात सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे सांगत आमदारांना मुंबईमध्ये राहण्यास घर देण्याची गरज नाही असे पवारांनी स्पष्ट केले. राज्याच्या विकाससाठी सरकारने पैसे खर्च करावा असा सल्ला ही शरद पवार यांनी दिला असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *