घरातील दिवे बंद करून मेणबत्ती, मोबाईल flash लाईट लावण्याचा सल्ला म्हणजे देशातील नागरिकांची दिशाभूल – आमदार आण्णा बनसोडे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन : पिंपरी ; आपल्या देशाचे पंतप्रधानांनी २२ मार्च रोजी जनता करुफु घोषणा केली की ५ वा. सर्वानी घरासमोर गच्चीतून घंटा , थाळी, टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले, नागरिकांना वाटले कोरोना गेला पण संकट कायम राहिले. आता मा. पंतप्रधान यांनी ५ तारखेला रात्री ९ वा. ९ मिनिटांनी घरातील लाईट चे दिवे बंद करून गच्चीतून मेणबत्ती , मोबाईल flash लाईट लावण्याचे आवाहन क ले आहे. जनता प्रचंड आशावादी आहे की ‘’काहीतरी  जादू होईल आणि आपल्या देशावरील कोरोनाचे संकट टळेल’’ मुळात देशावर कोरोनाचे संकट का ओढावले हाच प्रश्न आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये चीन मधुन सुरु झालेल्या कोरोना साथीने डिसेम्बर पासून जगभरात आपला विस्तार वाढविण्यास सुरुवात केली असताना आपली उच्चस्तरीय जागतिक घडामोडीवर लक्ष देणारी यंत्रणा मात्र साखर झोपेत होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोरोनाच्या साथी बाबतीत वेळीच योग्य पाऊल केंद्रशासनाने उचलून आवश्यक निर्णय घेतले असते तर आज देशातील आणि राज्यातील सामान्य जनतेसमोर बेराजगारीचे व उपासमारीचे संकट उभे राहिले नसते. आज ८० टक्के मध्यम वर्गीय व सामान्य जनता हवालदिल आहे. मजुर , घर कामगार, हॉटेल कामगार, वेठबिगार, झोपडपट्टीत राहणारे, भिक्षकु, अनाथ, अपंग अशा समाज्यातील कनिष्ठ व दारिद्र्य रेषेखालील जनतेचा यात काय दोष होता. केंद्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्याने ही परीस्थीती निर्माण झालेली आहे. देशात जानेवारी २०२० पासून परदेशातून येणा-या नागरिकांवर योग्य प्रकारे चनबांध घालून राज्य सरकारला वेळीच मार्गदर्शन केले असते तर आज ही टाळेबंदी करावी लागली नसती. भारताबाहरे असलेल्या धनाढ्यांच्यासाठी १३० कोटी जनतेचा जीव धोक्यात घालण्याचे पाप केंद्रीय नेतृत्वाने केले आहे. झोपडीत आपल्या कुटुंबासह गुण्यागोविंदाने राहणाऱ्या माझ्या गरीब जनतेचा काय दोष होता, त्याला चीन माहीत नाही की अमेररका. भाकरीचा चंद्र शोधनू कुटुंब चालवण्यात त्याची दमछाक होते असताना हे संकट त्याच्या समोर उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत ही याच सामान्य जनतेने पंतप्रधानांच्या आवाहनाला दिवसभर जनता करफू पाळून सायंकाळी टाळ्या, थाळ्या एवढेच काय घंटा वाजवनू साथ दिली, त्यांना वाटले कोरोनाचे संकट टळले, परंतू ते पुढच्या काळात गडद होणार याची त्यांना कल्पनाच नव्हती. थाळी , टाळ्या ,घंटा वाजवा , मेणबत्ती पेटवा मोबाईल flash लाईट लावा असे आवाहन सामान्य जनतेची किती दिशाभलू करणार आहात. भोळी जनता नम्रपणे आवाहनाला स्विकारत आहे. जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला होता. ह्या बेफिकिरीमुळे देशात कोरोनाचा प्रसार झाला आणि देश स्तब्त्ध होऊन गेला. भारताच्या इतीहासात टाळेबंदी (Lock Down) प्रथमच नोंद झाली. देशाचे अब्जावधींचे नुकसान झाले अर्थ व्यवस्था कोलमडून गेली. सामान्य माणसू जीवन-मरणाची लढाई मोठया धैयााने लढत आहे. पण ही अस्तित्वाची लढाई त्याच्यावर लादलेली आहे हे विसरून चालणार नाही.
राज्य शासन मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली अथकपणे रात्रंदिवस काम करीत आहेच. केंद्रशासनाने राज्यातील जनतेला पुढील 6 महिने नियमित अन्न-धान्य पुरवठा करावा, यात स्थानिक परराज्यातील असा भेदभाव न ठेवता देशाचा नागरीक म्हणनू केंद्रशासनाने जबाबदारी उचलून वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी राज्यांना मोठा निधी उपलब्त्ध करून द्यावा. सामान्य नागरीकाने गरजे पोटी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्ज वरील व्याज माफ करावे वीज बील, घरभाडे, घरपट्टी, पाणीपट्टी अशा सर्व देणी देण्यासाठी मदत करावी, ही सामन्य जनतेची माफक अपेक्षा आहे. शेवटी १५००००० प्रत्येक भारतीयाच्या खात्यात देण्याच्या आश्वासनाचा प्रश्न अनत्तुरीत राहतोच.
[नोटबंदीमध्ये सामान्य भरडला, घंटा/थाळी/टाळ्या जनतेकडून वाजवनू दिशाभूल, आता घरातील
लाईटचेच दिवेबंद करून गच्चीतून मेणबत्ती लावण्याचे पतंप्रधानांचे आवाहन हे दिशाभलू करणारे असून किती दिवस जनतेची फसवनुक करणार. एक दिवस जनता सुध्दा तुम्हाला फसविल्या शिवाय राहणार नाही.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *