रिझर्व्ह बँकेची माहिती ; बँकिंग घोटाळ्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । भारतात मागील सात वर्षात झालेल्या बँक घोटाळे आणि फसवणूकीतून मोठे आणि गंभीर परिणाम सध्या भोगावे लागत आहेत. नुकतीच याबाबतची माहिती भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दिली आहे. भारताचे या घोटाळ्यांमुळे दररोज तब्बल 100 कोटींचे नुकसान होत असल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँक घोटाळे आणि फसणूकीत अव्वल स्थानी आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र बँक घोटाळे, फसवणूकीत पहिल्या क्रमांकावर आहे, तर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर देशाची राजधानी दिल्ली आहे. घोटाळे आणि फसवणूकीवर आळा घालण्यासाठी अनेक कठोर नियम लावण्यात आले आहेत. पण, याचा काहीही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. या बँक घोटाळा आणि फसवणूकीतून फक्त बँकाचेच नुकसान होत नाही. तर सर्वसामान्यांनाही फटका बसत आहे.

आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, भारताला मागील सात वर्षांत झालेल्या बँकिंग घोटाळ्यामुळे दररोज 100 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. घोटाळ्यांच्या संख्येत प्रत्येकवर्षी कपात होत आहे. सर्वाधिक आधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात होणाऱ्या घोटाळ्यापैकी 50 टक्के घोटाळे महाराष्ट्रात झाले आहे.

सर्वाधिक बँक घोटाळे महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये झाले आहेत. मागील सात वर्षात या पाच राज्यात 83 टक्के बँक घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या पाच राज्यात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक घोटाळे झाले आहेत.

आरबीआयने दिलेल्या आकडेवारीनुसार, एक एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत देशात 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली आहे. 67,760 कोटी रुपयांची फसवणूक आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये समोर आली. यामध्ये 2016-17या आर्थिक वर्षात घट पाहायला मिळाली. या काळात 59,966.4 कोटींची फसवणूक जाली. 2019-20 काळात 27,698.4 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 10,699.9 कोटी रुपयांची फसवणूक झाली. आर्थिक वर्षा 2021-22 च्या पहिल्या 9 महिन्यात (एप्रिल-डिसेंबर) मध्ये 647.9 कोटींची फसवणूक झाली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *