आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३१ मार्च । आर्थिक गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी इनकम टॅक्स विभागाने 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड (PAN-Aadhaar link) लिंकिंग सक्तीचे केले आहे. तुम्ही जर तुमचे पॅनकार्ड 31 मार्चपर्यंत आधार कार्डला लिंक केले नाही तर तुम्हाला 31 मार्चनंतर देखील आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगसाठी संधी मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला दंड (PAN-Aadhar non link Penalty) भरावा लागणार आहे. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार तुम्ही जर 30 जून 2022 पर्यंत आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले तर तुमच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तुम्ही जर 30 जून 2022 नंतर पॅन कार्डला आधार लिंक केले तर मात्र तुम्हाला एक हजारांचा दंड भरावा लागणार आहे. आयकर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तुम्ही जर 31 मार्चपर्यंत पॅन कार्डला आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन बंद (Inactive PAN) होणार नाही, मात्र तुमच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

जर तुम्ही तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तरी देखील तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरणे, इनकम टॅक्स रिफंड यासारखी कामे करू शकणार आहात. 2023 मध्ये देखील तुमचे पॅन कार्ड चालूच राहणार आहे. मात्र 31 मार्च 2022 नंतर 30 जून 2022 पर्यंत तुम्हाला पॅन आधारला लिंक करण्यासाठी पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर त्यानंतर या दंडामध्ये वाढ होणार असून, एक हजारांचा दंड भरावा लागेल. आज आधार कार्डला पॅन कार्ड मोफत लिंक करण्याचा शेवटचा दिवस आहे. या संधीचा पॅन कार्ड धारकांनी फायदा घ्यावा असे आवाहन आयकर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

इनकम टॅक्स विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार 24 जानेवरी 2022 पर्यंत तब्बल 43.34 पॅन कार्डधारकांनी आपले पॅन आधारला लिंक केले आहेत. देशात आतापर्यंत 131 कोटी लोकांना आधार कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असून, आधारला पॅन लिंक केल्यास पॅन कार्डचा गैरवापर थांबवने सहज शक्य होणार असल्याचे आयकर विभागाकडून सांगण्यात आले आहे. आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केल्यास कर चोरीला देखील आळा बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *