‘आरटीई’ ; पालकांची प्रतीक्षा संपणार ‘आरटीई’ची सोमवारी लॉटरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । राज्यभरात सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत 10 मार्चला संपली होती. त्यामुळे लॉटरीकडे पालकांचे लक्ष लागले होते. पालकांची आता प्रतीक्षा संपली असून, येत्या सोमवारी (दि. 4) लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीसह प्रतीक्षा यादी आरटीईच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.

आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. राज्यभरात 9 हजार 86 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 947 जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून 2 लाख 82 हजार 778 पालकांनी अर्ज भरले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यातील 422 शाळा पात्र ठरल्या असून, 4 हजार 927 जागांसाठी 16 हजार 566 अर्ज आले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा तब्बल तिप्पट अर्ज आल्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेत मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

 

शाळा- 9088

उपलब्ध जागा-1,01,947

आपापर्यंत प्राप्त अर्ज-2,82,778

मोबाइलवर येणार संदेश…
आरटीई 2022-23 या वर्षाकरिता लॉटरीद्वारे निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची यादी सोमवारी (दि. 4) सायं. 4 नंतर आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. तसेच प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदविलेल्या मोबाइलवर संदेश पाठविला जाणार आहे. मात्र, एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *