महाराष्ट्र 24 – ऑनलाईन- जिल्हा प्रतिनिधी – सलमान मुल्ला-ईटकूर : – कळंब तालुक्यातील ईटकूर येथील ग्राममंचायत कार्यालयात भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस प्रदिप भैय्या फरताडे आणि भाजपा संलग्न चित्रपट कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण तात्या शिंदे पाटील यांच्या पुढाकाराने” *आशेची पालवी, सुखाचा मोहर, समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, नववर्षाच्या शुभेच्छा तुमच्या साठी “*.
या संकल्पनेतुन गुढीपाडवा व मराठी नुतुन वर्षाच्या ग्रा .प . कर्मचारी, कामगार यांच्या साठी सरपंच सौ. मोहराताई कसपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रा.प. कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ग्रा.प.सदस्य गुंडेराव गंभीरे, हनुमंत कसपटे, विनोद चव्हाण, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष भारत तात्या जाधव, तात्याराम गंभीरे, सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम शिंदे, भाजपा माजी ता. उपाध्यक्ष शिवाजी तात्या आडसुळ,भाजपाचे रितेश लगाडे, आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ग्राप . कर्मचारी लिपीक लक्ष्मण गंभीरे, शिपाई बाबु शिंदे, गणेश माळी, समाधान बावळे, डाटा इंन्ट्री ऑपरेटर किरण लगाडे, कामगार कांबळे, सावंत, चव्हाण, आदिंचा उपस्थितांच्या हस्ते हार घालुन व हार भेट देवून पाडव्याच्या त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.