“या” राशींना आज दिवस आर्थिक फायद्याचा ; पहा आजचे राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 4 एप्रिल ।

मेष:-
आज बोलतांना शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. तुमच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ शकतो. अधिकारी व्यक्तींची गाठ पडेल. कामात स्त्री वर्गाचा हातभार लागेल. कमिशनमधून लाभ मिळेल.

वृषभ:-
आज आततायीपणा करून चालणार नाही. रागावर नियंत्रण ठेवावे. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्यातील कार्यक्षमता दाखवून द्यावी. आपल्या कामाशी प्रामाणिक रहा.

मिथुन:-
अनावश्यक खर्च टाळावेत. जुनी प्रकरणे त्रासदायक ठरू शकतात. मानसिक स्वास्थ्य जपावे. जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वरिष्ठांची मर्जी संपादन करा.

कर्क:-
आज मैत्रीतील गैरसमज दूर करावेत. जनसंपर्क वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. अचानक धन लाभाची शक्यता. मालमत्तेचे व्यवहार सावधतेने करावेत.

सिंह:-
आज जोडीदाराची प्रगती दिसून येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामात काही स्वरुपाचे बदल करावे लागतील. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल.

कन्या:-
आज दिवस आपल्या मर्जी प्रमाणे घालवाल. प्रवासात काळजी घ्यावी. मुलांचे विचार विरोधी वाटू शकतात. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

तूळ:-
आज मानसिक चंचलता जाणवेल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेचा आस्वाद घ्याल. जवळचे मित्र भेटतील.

वृश्चिक:-
आज काही सांसारिक तडजोडी स्वीकाराव्या लागतील. प्रवासात क्षुल्लक त्रास जाणवू शकतो. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. घरासाठी मोठी वस्तु खरेदी कराल. सामुदायिक वादापासून दूर राहा.

धनू:-
आज आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने कामे हाती घ्याल. कौटुंबिक खर्च नियंत्रणात ठेवा. चुगल्या करणार्‍या व्यक्तींपासून दूर रहा. कष्टाने कार्य पार पाडाल.

मकर:-
आज क्षुल्लक कारणांवरून चीड-चीड वाढेल. जवळच्या ठिकाणी प्रवासाचा योग येईल. कौटुंबिक जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडाल. मानसिक चंचलतेला आवर घालावी. जुन्या गोष्टी सोडून द्याव्यात.

कुंभ:-
आज दिवसभर कामाची दगदग राहील. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपले व्यक्तिमत्वाची इतरांवर छाप पाडाल. अपयशाला घाबरून जाऊ नका. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

मीन:-
आज झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. पत्नीची उत्तम साथ मिळेल. क्षणिक सौख्याची अनुभूती घ्याल. भावंडांशी मतभेद संभवतात. तरुणाचे विचार जाणून घ्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *