Raj Thackeray वर बोलू नका असदुद्दीन ओवेसीचा एमआयएम कार्यकर्त्यांना फर्मान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । काल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या (Masjid) बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. काल झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसीनी (Asaduddin Owaisi)फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही असं ओवेसी यांनी सांगितलं आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित केले. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या धडाकेबाज शैलीत दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणची बदलती लोकसंख्या अधोरेखित केली आणि पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम येथे येऊन स्थायिक झाल्याचा आरोप केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *