Samsung 5G Phone: सॅमसंगचा नवीन 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 3 एप्रिल । सॅमसंगने (Samsung) भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो 5G सेगमेंटमधील मोबाईल फोन आहे. या स्मार्टफोनचे नाव सॅमसंग गॅलेक्सी एम 33 5जी (Samsung Galaxy M33 5G) असं आहे. कंपनीने मागील वर्षी Samsung Galaxy M32 5G लॉन्च केला होता. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे (5G Smartphone Under 20000). तसेच, हा फोन चांगल्या रंगाच्या पर्यायांमध्ये येतो. चला तर मग सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया. हा सॅमसंग एम सीरीजचा स्मार्टफोन ओशन ब्लू आणि ग्रीन या दोन कलर व्हेरियंटमध्ये येतो. भारतात 8 एप्रिलपासून अमेझॉन या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्याची विक्री सुरू होईल.

Samsung Galaxy M33 5G ची सुरुवातीची किंमत 17,999 रुपये आहे, ज्यामध्ये 6 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19499 रुपये ठेवण्यात आली आहे. लॉन्च ऑफर अंतर्गत, युजर्स ICICI बँक क्रेडिट कार्डच्या मदतीने 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात.

Samsung Galaxy M33 5G च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.6 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. याचे रिझॉल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल इतकं आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120hz इतका आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कंपनीने यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 दिला आहे. हा सॅमसंग स्मार्टफोन Exynos 1280 5 nm चिपसेटवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेमध्ये V आकाराचा कटआउट देण्यात आला आहे, जिथे सेल्फी कॅमेरा बसवला आहे.

Samsung Galaxy M33 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, तर 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे आणि इतर दोन कॅमेरे 2-2 मेगापिक्सलचे आहेत. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या सॅमसंग मोबाईल फोनमध्ये 6000 mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 25W च्या सपोर्टसह येते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि हा फोन 3.5 मिमी ऑडिओ जॅकला सपोर्ट करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *