मोठे संकट ! अर्ध्या महाराष्ट्रावर विजेचे संकट ओढविण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । Low water reserves in Koyna : राज्यात उष्णतेची लाट आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. तर राज्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या कोयना धरणातील जलासाठीही कमी झालाय. त्यामुळे विज उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Power crisis in Maharashtra) विजेची वाढती मागणी आणि कोयना धरणातील आरक्षित पाणी साठ्यापैकी याआधी वापरलेला पाणी साठा पाहता यंदा मे महिन्यामध्येच पश्चिमेकडूल पाणी कोटा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ध्या महाराष्ट्रावर विजेचे संकट ओढविण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांसाठी आरक्षित पाण्यापैकी केवळ 11.51 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड उन्हाळा आणि सर्वाधिक मागणीच्या काळात पाण्याअभावी पश्चिमेकडून वीज निर्मिती बंद पडण्याची भीती आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला अंधाराला सामोरं जावे लागेल. याशिवाय सिंचनाचा प्रश्नही गंभीर होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पांची एकूण 1960 मेगावॅट क्षमता आहे. मात्र, लवादाच्या कोट्यामुळे येथे वर्षभरात सरासरी 20 टक्के क्षमतेनेच वीज निर्मिती होते. कोयना धरणात पश्‍चिमेकडे वीज निर्मितीसाठी लवादाच्या निर्णयानुसार आरक्षित कोट्यानुसार 67.50 टीएमसी पाणी आरक्षित असते. पश्‍चिमेकडे दरमहा सरासरी साडेपाच टीएमसी पाणी वापरले जाते. पावसाळ्यात कमी आणि उन्हाळ्यात मागणीनुसार विजेसाठी जादा पाणी सोडण्यात येते. त्यामुळे आगामी दोन महिन्यांसाठी विजेसाठी आरक्षित शिल्लक अवघा 11.51 टीएमसी पाणीसाठा सध्या चिंतेचा विषय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *