महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ एप्रिल । आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. कालच्या पंजाब आणि चेन्नईच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या यादीत बदल झालाय.
दोन खेळाडू ऑरेंज कॅपच्या शर्यतीत
रविवारी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. रविवारच्या सामन्यानंतर पंजाबकडून लिविंगस्टनने 60 धावा काढल्या तर चेन्नईकडून शिवम दुबे याने 57 धावांची खेळी खेळली करून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आपलं स्थान पक्क केलं. यामुळे ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये पुन्हा एकदा बदल पहायला मिळाला.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज
फलंदाज धावा
इशान किशन 135
जोस बटलर 135
शिवम दुबे 109
लियाम लिविंगस्टोन 98
आंद्रे रसेल 95
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
उमेश यादव 8 59
राहुल चहर 6 60
युझवेंद्र चहल 5 48
मोहम्मद शमी 5 55
टीम साऊदी 5 56
पर्पल कॅपचा मानकरी कोण?
फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा उमेश यादव आघाडीवर असून त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत.यानंतर दुसऱ्या स्थानी राहुल चहर आला असून त्याने 6 विकेट घेतचल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी दुसऱ्या स्थानावर असलेला युझवेंद्र चहल आलाय. युझवेंद्रने 5 विकेट घेतल्या आहेत. पाच विकेट घेणारा मोहम्मद शमी हा चौथ्या स्थानावर असून साऊदीनेही पाच विकेट घेतलाय. सौदी पाचव्या स्थानावर गेलाय.