महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol Diesel Price Today) जनतेला दिलासा दिला आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले भाव आज स्थिर असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.
22 मार्चपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 वेळा वाढ केली आहे (Hike in Petrol Diesel Price). या काळात दोन्ही प्रकारचे इंधन सुमारे 10 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी, 4 नोव्हेंबर 2021 नंतर, कंपन्यांनी सुमारे चार महिने त्यांच्या किमती वाढवल्या नाहीत. या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेली आणि आता या दबावाची भरपाई करण्यासाठी कंपन्या सातत्याने किंमती वाढवत आहेत.
गुरुवारी कोणतीही वाढ न झाल्याने राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर झाला आहे. सध्या देशात विकलं जाणारं हे सर्वात महाग पेट्रोल आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर –
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर