महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । गुरुवारसाठी पेट्रोल-डिझेलचे दर भारतीय तेल कंपन्यांनी जारी केले आहेत. आज सर्वसामान्यांना सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरवाढीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये आज कोणतीही वाढ केलेली नसल्यामुळे आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
पेट्रोल-डिझेलचे दर देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेले होते. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
दरवाढ न झाल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा स्थानिक करामुळे दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकले जात आहे.