Pune Fire | मोशीच्या कचरा डेपोवर अग्निकल्लोळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । पिंपरी चिंचवडमधील मोशीच्या कचरा डेपोला लागलेली भीषण आग (Moshi Garbage Depot Fire) अजूनही धुमसतीच. बारा तासांहून अधिक काळापासून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. काल (बुधवारी) संध्याकाळी सहा ते सव्वा सहा वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना (Pimpri Chinchwad) समोर आली होती. मात्र अद्यापही ही आग धुमसत असून ती विझवण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे (Pune Fire) जिल्ह्यात पिंपरी चिंचवड परिसरातील मोशीच्या कचरा डेपोवर ही आग लागली आहे. आतापर्यंत अग्निशमन दलाची 85 वाहनं ही आग विझवण्यासाठी गेल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

35 लाखांच्यावर लोकसंख्या असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या दैनंदिनीतून निर्माण होणारा कचरा मोशी येथील कचरा डेपोमध्ये संकलित केला जातो. लाखो टन कचरा एकत्रित जमा केल्यामुळे त्याला डोंगराचं स्वरुप आलेलं आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास या कचऱ्याच्या डोंगराला भीषण आग लागली.

आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर धुराचे असंख्य लोट आकाशामध्ये झेपावत होते. यामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली असल्याने पिंपरी-चिंचवडकरांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. पालिका प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळेच कचरा डेपोला सातत्याने आग लागण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *