प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ एप्रिल । कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता महापालिका आणि स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आयाराम गयारामांची एंट्री सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी (Asawari Joshi join ncp) यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात (ncp office mumbai) असावरी जोशी यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीचे मुख्यालयात छोटेखानी प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत असावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, मागील वर्षी आसावरी जोशी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक लढवणार अशी शक्यता होता. पण, वर्षभर काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कोण आहेत आसावरी जोशी?

आसावरी जोशी यांचा जन्म 6 मे 1965 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपाणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. पुढे त्यांचं काम पाहून त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 1986 ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *