![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.८ एप्रिल । राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट बघावयास मिळणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. त्यानुसार धुळ्यात देखील पारा वाढला असून दोन दिवसांपासून तापमान ४२ अंशाच्या वर गेले आहे. (dhule news temperature in Dhule increased on last week)
गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात (Dhule) तापमानाचा पारा हा ४१ अंशाच्या वरतीच बघावयास मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी 42.5 अंश सेल्सिअसवर तापमानाचा पारा पोहोचला होता. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
उष्माघाताचा धोका; उन्हाचा कडाका अधिकच वाढला आहे. शिवाय, उष्णतेच्या झळा देखील जाणवत आहे. यामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे. हा धोका लक्षात घेता नागरीक दुपारच्यावेळी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. यामुळे रस्त्यावरती शुकशुकाट बघावयास मिळत आहे.