महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price Today) गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सातत्यानं देशात महागाई वाढत आहे. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल (Petrol) – डिझेल (Diesel) च्या किमतींमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ झाली आहे. त्यासोबतच लोकांना एक लिटर पेट्रोलसाठी आपला खिसा रिकामा करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडलं आहे. दरम्यान, गेल्या 16 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत तब्बल 10 रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांची परिस्थिती काय?
देशातील महानगरांत दर काय?
शहरं पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77
दिल्ली 105.41 96.67
चेन्नई 110.85 100.94
कोलकाता 115.12 99.83
हैद्राबाद 119.49 105.49
कोलकाता 115.12 96.83
बंगळुरू 111.09 94.79
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.