महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । पाकिस्तानमध्ये मध्यरात्री घडलेल्या घडामोडीनंतर इम्रान खान यांचे सरकार कोसळले आहे. इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ठरावाच्या बाजूने 174 मते पडल्याने इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागणार आहे.
इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील अविश्वास ठरावाला मध्यरात्री मतदानाला सुरुवात झाली. मतदान सुरू होण्यापूर्वीसभापती आणि उपसभापती यांनी राजीनामा दिला. मतदानाला सुरुवात होताच मध्यरात्री झाल्याने कामकाज दोन मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर पाकिस्तानी वेळेनुसार 12 वाजून 2 मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली. इम्रान खान यांच्या विरोधातील हा अविश्वास प्रस्ताव 174 मतांनी मंजूर करण्यात आला.
इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेत्या मरियन नवाझ शरिफ यांनी एक ट्विट केले आहे. माझ्या लाडक्या पाकिस्तानचे दु:खद स्वप्न आता संपले आहेत. आती ही वेळ दुरुस्तीसाठीची आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
शाहबाज शरिफ पुढील पंतप्रधान
इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शाहबाज शरिफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असणार आहेत. इम्रान खान यांचे सरकार कोसळल्यानंतर देशासाठी ही नवीन पहाट असून लोकांच्या दुआ कबूल झाल्याचे ते म्हणाले.