महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । श्रीलंकेच्या खजिन्यात केवळ ५ हजार कोटी रुपयांची परदेशी गंगाजळ राहिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहे. अशा परिस्थितीत देशाला सुमारे २२ हजार कोटी रुपयांची गरज आहे. ही आर्थिक मदत मिळाली तरच देश संकटातून बाहेर पडू शकेल, असे अर्थमंत्री अली साबरी यांनी म्हटले आहे. भारताने ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. शनिवारी देखील श्रीलंकेत निदर्शने सुरू होती. लष्कर व पोलिसांनी पंतप्रधान महिंदा राजपेक्ष यांच्या निवासकडील सर्व मार्ग बंद केले. कोलंबोतील अमेरिकन राजदूत कार्यालयासमोर संतप्त निदर्शकांनी अमेरिकेकडे पंतप्रधानांच्या संपत्तीला जप्त करण्याची मागणी केली. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा राहत असलेल्या न्यूयॉर्कमधील निवासस्थानाबाहेर अमेरिकेतील श्रीलंकन समुदायाने निदर्शने केली. लंडनमध्येही श्रीलंकन समुदायाने निदर्शने केली.