सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सखोल चौकशीसाठी पोलिस पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची 2 दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार आहे. त्यांना आज सकाळी 11 वाजता पोलिस गिरगाव कोर्टात हजर करणार आहेत.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गावदेवी पोलिस सदावर्तेंची पुन्हा कोठडी मागणार आहे. सदावर्ते यांच्या सखोल चौकशीसाठी पोलिस अधिकची कोठडी वाढवून मागणार आहेत.

एसटी संपकऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी सिल्व्हर ओकवर दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला होता. एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देण्याच्या आरोपाखाली अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. तर इतर 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज सदावर्ते यांची पोलिस कोठडी संपणार असून, पोलिस सखोल चौकशीसाठी कोठडीत वाढ करावी, अशी मागणी करणार आहेत.

न्यायालयाने एसटी कामगारांना हजर राहण्यास सांगितल्या नंतर एसटी कर्मचारी संतप्त झाले. शरद पवार यांच्यामुळेच एसटी विलीनीकरण झाले नाही असे संपकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शुक्रवारी संतप्त झालेल्या आंदोलकांनी शरद पवार यांच्या मुंबई निवासस्थानी सिल्व्हर ओकवर मोठा गोंधळ घातला होता. त्यात अनेकांनी पवारांच्या घरावर दगडफेक आणि चपलफेक करत निषेध केला होता. त्यानंतर पोलिसांनी सदावर्तेसह अन्य 109 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. सदावर्ते यांना शनिवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानुसार आज त्यांची पोलिस कोठडी संपणार आहे. मात्र, सदावर्ते यांची सखोल चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी आज न्यायालयात पोलिस करणार आहे. त्यामुळे आज सदावर्ते यांना दिलासा मिळतो की, त्यांच्या कोठडीत वाढ होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *