‘उत्तर’सभेत पुन्हा गाजणार ‘लाव रे तो व्हिडीओ’?; मनसे नेत्याचे सूचक ट्विट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा होत आहे. आजच्या सभेत राज ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. (raj thackeray sabha)

‘उत्तर’सभेत पुन्हा गाजणार ‘लाव रे तो व्हिडीओ’?; मनसे नेत्याचे सूचक ट्विट
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचं लाव रे व्हिडिओ हा प्रचाराचा पॅटर्न लोकप्रिय झाला होता. मातब्बर नेत्यांनीही राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडिओचा धसका घेतला होता. त्यानंतर आजच्या ठाण्यातील उत्तरसभेतही पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. याबाबत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्वीट केलं आहे.

राज ठाकरेंची ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतन सर्कल येथे जाहीर सभा होणार आहे. सभेच्या आधी राज ठाकरेंच्या आवाजातील एक टीझरही मनसेकडून जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता या सभेच लाव रे तो व्हिडिओ पुन्हा ऐकायला मिळणार असल्यानं पुन्हा उत्सुकता वाढली आहे. संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन लाव रे तो व्हिडिओ पुन्हा ऐकायला मिळणार असल्याचं म्हटलं आहे. राजसाहेबांच्या गुढी पाडवा मेळाव्यानंतर ज्यांना लाव रे तो व्हिडिओची खूप आठवण येत होती त्यांच्यासाठी आजची सभा खास, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज, मंगळवारी ठाण्यात होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून ४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून सभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील पोलिस करणार आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सभेची जय्यत तयारी केली असून, राज यांच्या स्वागतासाठी ठाण्याच्या वेशीवरून दोनशे चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांची रॅलीदेखील काढण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *