या राज्यात सर्व रेशनकार्ड धारकांना मिळणार डीजी लॉकर सुविधा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील सर्व ३.६ कोटी रेशन कार्ड धारकांसाठी नवी सुविधा सुरु केली आहे. या सर्व रेशनकार्ड धारकांना डिजिटल लॉकर सुविधा दिली जाणार आहे. त्याचे फायदे म्हणजे यामुळे रेशन कार्ड हरविणे, जुने होणे, फाटणे, खराब होणे वाचेल शिवाय केंद्र सरकारने सुरु केलेल्या वन नेशन वन कार्ड योजनेचा फायदा हे रेशनकार्ड ग्राहक देशात कुठेही रेशन कार्ड बरोबर नसले तरी घेऊन शकणार आहेत. शिवाय यामुळे बनावट रेशन कार्ड नियंत्रणात येऊ शकणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १०० दिवस कार्य योजनेत या मोहिमेचा समावेश केला असून लवकरात लवकर ही मोहीम पूर्ण केली जात आहे. यामुळे प्रत्येक ठिकाणी कार्ड बरोबर नेण्याची गरज संपुष्टात येईल आणि जेथे गरज आहे तेथे हे कार्ड डिजिटली पाहता येईल. कार्ड हरविण्याचा धोका त्यामुळे कमी होणार आहे. जेवढ्या सदस्यांची माहिती कार्ड मध्ये आहे तेव्हाढया लोकांचे रेशन दुकानदारांना द्यावे लागणार आहे. अनेकदा कार्ड फाटले असेल तर दुकानदार पूर्ण रेशन देत नाहीत असा अनुभव आहे. त्याला यामुळे चाप लागणार आहे. रेशन घेतल्याची नोंद सुद्धा डिजिटली घेतली जाणार आहे त्यामुळे अफरातफरीला आळा बसणार आहे.

डिजिटल लॉकर मध्ये आवश्यक आणि महतवाची कागदपत्रे डिजिटली साठवून ठेवता येतात. पॅनकार्ड, लायसन्स, व्होटर आयडी, विविध प्रकारची प्रमाणपत्रे यात सुरक्षित ठेवता येतात. डिजिटल लॉकर सेवेसाठी आधार कार्ड गरजेचे आहे. या सेवेमुळे एखादा दस्तावेज हरविला तरी डिजिटल लॉकर मध्ये तो साठविला असल्यास दाखविता येतो आणि तो ग्राह्य मानला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *