Ropeway Accident: हात सुटला अन् हेलिकॉप्टरमधून कोसळला तरुण, थरकाप उडवणारा VIDEO

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । झारखंडमधील देवघर येथे रोपवे दुर्घटनेनंतर (Jharkhand Ropeway Accident) तब्बल 40 तास उलटूनही बचावकार्य पूर्ण होऊ शकलं नाही. सध्या 10 जण रोपवेच्या ट्रॉलीमध्ये आहेत. बचाव कार्यादरम्यान हवाई दलाचे हेलिकॉप्टर पकडण्याच्या प्रयत्नात खाली कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक तरुण हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला लटकलेला आहे. बराच वेळ तो याच अवस्थेत तिथेच राहातो. मात्र, अखेर त्याचा हात सुटतो आणि तो थेट खाली कोसळतो (Man Fell from Helicopter). काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ (Ropeway Accident Shocking Video) सध्या समोर आला आहे.

रोपवे चालवणाऱ्या दामोदर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे महाव्यवस्थापक महेश महातो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोपवेच्या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर 48 जण रोपवेमध्ये अडकले होते. बचावकार्य सुरू असताना खाली कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

38 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. अजूनही 10 लोक तिथे अडकले आहेत. महेश महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्र झाल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आलं होतं आणि तिथे अडकलेल्या लोकांना ड्रोनद्वारे अन्न आणि पाणी पोहोचवण्यात आलं.

रविवारी रामनवमीच्या दिवशी शेकडो पर्यटक देवघरच्या त्रिकुट डोंगरावर पूजा करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी पोहोचले होते. यावेळी रोपवेची एक ट्रॉली खालील बाजूला येत होती, जी अचानक वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या हवेत होत्या. घाईघाईत अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *