महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – पुण्यात अनेक ठिकाणी सील,पुण्यातील भवानी पेठ नाना पेठ आणि मंगळवार पेठेत टाळे बंदी करण्यात आली आहे. गुल टेक़डीचा परिसरही सील करण्यात आला आहे. पुण्यामध्ये एकाच दिवसात ३७ रुग्ण पॉझिटीव्ह, शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०० च्यावर तर जिल्ह्यात सुमारे १५० रुग्ण झाले आहेत. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ११ वर येऊन पोहोचलीये त्यामुळे दिवसेंदिवस वाढत असलेल्या या संख्येमुळे यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिले आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची आणि कोरोनाच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२ वर गेला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात नवे १२० रूग्ण आढळून आले आहेत. तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या मुंबईत कोरोनाचे नवे ६८ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा आता ५२६ वर गेला आहे. तर सोमवारी दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. तर नागपुरात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे ६८ वर्षीय व्यक्तीचं मेयो रुग्णालयात निधन झाले. मृताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. तर बुलढाण्यात दोघे तर बारामतीत एक जण कोरोनाबाधित सापडला आहे.