महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – कोरोनाने अमेरिकेत थैमान घातले आहे. १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने त्रस्त झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवावी आणि या औषधाचा पुरवठा अमेरिकेला करावा अशी मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी म्हटले की, भारताने अमेरिकेशी नेहमीच चांगला व्यवहार केला आहे. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या औषधासाठी मी पंतप्रधान मोदींशी फोनवर बोललो आहे. ते नक्कीच यासाठी सरकारात्मक प्रतिसाद देतील असे ते म्हणाले.
ट्रम्प पुढे म्हणाले की, माझे पंतप्रधान मोदींशी या औषधांसाठी रविवारी फोनवरून बोलणे झाले. यावेळी मोदी यांनी अमेरिकेला हे औषध देण्यासाठी विचार करू असे म्हटले आहे. भारताने आम्हाला या औषधाचा पुरवठा करत असल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मात्र जर भारताने अमेरिकेला हे औषध देण्यासाठी परवानगी दिली नसती, तर काही हरकत नव्हती, यावर आम्ही जशाच तस उत्तर दिले असते, आणि ते आम्ही का करू नये? असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.