![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ एप्रिल । उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी । सलमान मुल्ला । कळंब । साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे. त्याच्याबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. आपल्याकडे आढळणाऱ्या अनेक सापांच्या जाती बिनविषारी आहेत. साप दिसला की लोक त्यांना मारायचे. हे प्रसंग लहानपणी अनेकदा बघितले. त्यामुळे मनाला वेदना व्हायच्या. वयाच्या 21 व्या वर्षांपासून 6 वर्षांच्या काळात 500 च्या वर सापांना पकडून त्यांच्या अधिवासात सोडून दिले, अशी माहिती कळंब येथील ध्येयवेडा सर्पमित्र इरफान उर्फ बबलु शेख याने दिली.
साप हा दोन अक्षरी शब्द असला तरी या नावानेच चांगल्या चांगल्याना घाम फुटतो. साप दिसला की, तो विषारी आहे का बिनविषारी याची माहिती नागरिकांना नसल्याने त्याला मारले जाते. त्यामुळे झपाट्याने सरपटणाऱ्या जिवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कळंब येथील सुल्तानपुरा (मोहा रोड) येथे रहिवासी असलेला हा तरुण सर्पमित्र म्हणून काम करत आहे.
लहान असताना कुठे साप निघाला की, त्याला पहायला जात होता. नागरिक त्या सापाला मारून टाकायचे. त्यामुळे मनाला वेदना होत होती. आपण सर्पमित्र होऊन सापांना जीवदान दिले पाहिजे, असा विचार त्याचा मनात सातत्याने येत होता.
कळंब तालुक्यातील डिकसळ येथे एक धामण जातीचा साप निघाला होता. नागरिक त्याला मारण्याच्या तयारीत असताना बबलुने त्याला पकडले व जंगलात सोडून दिले. तेव्हा साप पकडायला सुरुवात केली.
त्यावेळी सापांबाबत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे औरंगाबाद येथे झालेल्या सर्पमित्र संमेलनात सहभाग घेऊन अधिक माहिती मिळविली. आपल्या कडे आढळत असलेले अनेक जातीचे साप हे बिनविषारी आहेत. तरीदेखील नागरिक त्यांना मारतात.
वयाच्या 21 व्या वर्षापासून आतापर्यंत घोणस, धामण, कोब्रा,मण्यार,कुकरी,तस्कर,कवड्या,वॉटरस्नेक, दुरख्या घोणस,मांडुळ असे अनेक साप पकडले आहे.
साप पकडल्यावर त्याची पूर्ण माहिती वनविभागाला दिली जाते. त्यानंतर पकडलेल्या सापांना जंगलात सोडतो. साप पकडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही. साप दिसला की नागरिक त्यांना मारून टाकतात, हे चुकीचे आहे. प्रत्येक साप हा विषारी नसतो तसेच साप हा शत्रू नाही तर शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याला आपण इजा पोहचवत नाही तोपर्यंत तो कोणालाही चावा घेत नाही. त्यामुळे सापांना मारू नये, साप निघाल्यास सर्पमित्रांशी संपर्क करावा.
इरफान उर्फ बबलु शेख
कळंब
मो नंबर:- 95274 40073