महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । पुण्यात पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ (CNG rates hike) करण्यात आली आले. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात प्रति किलो मागे दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पुणेकरांच्या (pune) खिशाला कात्री लागणार आहे. नव्या दरवाढीसह शहरात आता सीएनजीचे (CNG) दर प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचले आहेत. पुण्यात 15 दिवसांपूर्वी सीएनजीचे दर प्रति किलो 68 रुपये इतके होते. त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने ते 73 रुपयांवर पोहोचले तर आता पुन्हा एकदा त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पुण्यात सीएनजीचे दर प्रति किलो 75 रुपयांवर पोहोचले आहेत. सीएनजी वाढल्याने वाहतूक खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच महागाईचा भडका उडाला आहे, त्यात वाहतूक खर्च महाग होऊन इतर वस्तूंचे दर देखील वाढू शकतात. महागाईमुळे पुणेकर हैरान झाले आहेत.