महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पिंपरी – चिंचवड – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या टीम ने लॉकडाऊन’मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंत्रणा सक्षमपणे राबविली आहे. अतिशय उत्तम नियोजन करत इथल्या महापालिकेने पाणी, दिवाबत्ती, झाडलोट, कचरा उचलणे, दररोज शहर स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थित पार पाडले आहे.घरगुती कचरा उचलणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या, तसेच आवश्यक तिथे रसायन फवारणी , नागरिक घरी असल्याने पाण्याचा वापर अधिक होत आहे. त्यामुळे अधिकची मागणी लक्षात घेऊन महापालिकेने पाणीपुरवठा सुरळित सुरु रहावा यासाठीही प्रयत्न केले आहेत. महापालिकेचे पाच हजार स्वच्छता कर्मचारी रस्त्यावर आहेत. महापालिकेने चांगली यंत्रणा राबविल्याने नागरिकांना ‘लॉकडाऊन’ देखील सुसह्य झाला आहे. उत्तम नियोजन केल्याबद्दल महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि त्यांच्या टीम चे कौतुक केले जात आहे.