महाराष्ट्र २४- ऑनलाईन – लातूर : निलंगा येथे आढळलेल्या आठ कोरोना पोजेटिव्ह रुग्णांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरियाणातून प्रवास करत लातूर जिल्ह्यात 12 जण पोहोचले होते. निलंगा येथील एका धार्मिक स्थळावर ते दोन दिवस आश्रयाला थांबले होते. त्यांच्यापैकी 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आंध्र प्रदेशातील करनूल जिल्ह्यातील असलेल्या या आठ जणांचे दिल्ली कनेक्शन देखील समोर आले आहे. एकाच दिवशी आठ जण पोझिटिव्ह आढळल्याने लातूर जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी या आठ जणांना आश्रय देणाऱ्या धार्मिक स्थळाच्या संचालका विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. यासोबतच जिल्ह्यात असे कोणी बाहेर जिल्ह्यतून अथवा राज्यातून किंवा विदेशातून आले असतील तर तात्काळ प्रशासनाला माहिती दया. भले तो एखाद्याचा मुलगा असला तरी त्यांच्या घरच्यांनी माहिती न दिल्यास पालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा कडक इशारा देखील जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिला आहे.