महाराष्ट्र २४- ऑनलाईन – चीन, इटली आणि स्पेननंतर सर्वाधिक मृत्यूची नोंद अमेरिकेत झाली आहे. करोनावर लस मिळावी यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. फक्त अमेरिकाच नाही तर जगभरातील वैज्ञानिक यासाठी प्रयत्न करत आहेतकोरोना व्हायरस या महामारीनं अमेरिकेभोवतीचा विळखा घट्ट केला असून सोमवारपर्यत मृत्यूचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला होता. समुह संपर्काला सुरूवात झाली असून अमेरिका सर्वात धोकादायक आणि कठीण परिस्थितीत आहे. अमेरिकेत आतापर्यंत तीन लाख ६७ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे मृत्यूचा आकडा दहा हजार ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प सरकर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याचे वृत्त आहे.
अमेरिकेच्या सर्जन जनरलनी करोनाच्या या महामारीला दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पर्ल हार्बरच्या हल्ल्याप्रमाणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, या आठवड्यात अमेरिकेतमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशातच देशात दुसऱ्या पर्ल हार्बर हल्ल्यासाठी तयार राहा, अमेरिकेनंतर स्पेन, इटली आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश देशांनी आंतर्देशिय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केल्याने आंतराष्ट्रीय पर्यटक जागीच अडकून पडले आहेत. अमेरिकेने अशा आणीबाणीच्या स्थितीतही आपल्या नागरिकांना मदतीचा हात पुढे केला आहे. काठमांडू येथे अडकलेल्या अमेरिकन पर्यटकांना रविवारी विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले.