एसटी कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता जाहीर ; परिवहन मंत्री अनिल परब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – : लॉकडाऊनमध्ये डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि सरकारी कर्मचारी, अधिकारी यांच्यासह एसटी कर्मचारी अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी जाहीर केले.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, पोलिस, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटीचे कर्मचारी देखील जीव धोक्यातू घालून सेवा देतात. त्यांना दररोज ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार- परिवहन मंत्री @advanilparab यांची घोषणा

लॉकडाऊन काळात मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची सेवा पुरविण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची आहे. त्यानुसार 23 मार्च पासून मुंबई व उपनगरातील विविध ठिकाणावरून एसटीच्या बसेद्वारे दररोज कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची जबाबदारी एसटीचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. कर्मचाऱ्यांना सध्या मास्क व सॅनिटायझर देण्यात येत आहे. त्यामुळे कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *