महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । चेन्नई संघाच्या युवा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने शानदार खेळीतून मुंबईचे ३ गडी बाद केले. त्याने कर्णधार रोहितसह ईशान व ब्रेविसला बाद केले. – मुकेश चौधरीने यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केले. त्याने यंदा सहा सामन्यांत एकूण सात बळी घेतले आहेत. सर्वाधिक विकेटमध्ये तो संघाकडून दुसऱ्या स्थानावर आहे.
-मुकेशमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. आता मिळालेल्या संधीला सार्थकी लावताना त्याने स्वत:ला सिद्ध केले. तो आगामी काळात भारतीय संघात आपले स्थान निश्चित करू शकतो, अशा शब्दात सुरेश रैनाने मुकेशवर कौतुकांचा वर्षाव केला. त्याने गत सत्रादरम्यान धोनी आणि ऋतुराज गायकवाडला नेटवर गोलंदाजी केली होती.
-मुकेशने चार सामन्यांच्या पॉवरप्लेमध्येच बळी घेतले आहेत. त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध लक्षवेधी कामगिरी केली. त्याने तीन विकेट घेतल्या. यंदा गुजरात, बंगळुरू, हैदराबाद व पंजाबविरुद्ध सामन्यात प्रत्येकी एक बळी घेतला आहे.
-मुकेशने मुबंईविरुद्ध सामन्यात दोन्ही सलामीवीरांना शून्यावर बाद केले. अशी सर्वोत्तम कामगिरी करणारा मुकेश हा भारतातील पहिला व जगात तिसरा गोलंदाज
२०१७ मध्ये मुकेशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून पदार्पण केले. त्याने १३ प्रथम श्रेणी सामन्यांत ३८ बळी घेतले. १२ लिस्ट सामन्यांत १७ आणि १८ टी-२० सामन्यात २३ बळी घेतल्याची नोंद आहे.