महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । गेल्या पाच महिन्यांपासून राज्यात एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या वतीने बेमुदत संपाची हाक दिली होती. कुठलाच प्रकारचा तोडगा या संपावर निघत नसल्याने न्यायालयाने 22 एप्रिल पर्यन्त सर्व कर्मचऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आज औरंगाबाद (Aurangabad) मध्यवर्ती आगारातील १०० टक्के कर्मचारी कामावर हजर झाले असून तेरा बडतर्फ कर्मचऱ्याना कामावर हजर करून घेण्यासाठी त्यांना अपील करावं लागणार आहे. त्यानंतर त्यांना कामावर रुजू होता येणार आहे.
आगारातील सर्वच कर्मचारी हजर झाल्याने मध्यवर्ती बस स्थानकात मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी पाहायला मिळून आली आहे तर प्रवासी देखील आता पुन्हा मोठ्या संख्येने बस स्थानक परिसरात दिसून आली. कर्मचाऱ्यांच्या संपाचा मोठा फटका परिवहन विभागाला बसला होता त्याच बरोबर गेल्या पाच महिन्यांपासून प्रवाशांची गैरसोय झाली होती. त्याची चिंता आता दूर झाली आहे. कामावर रुजू झाले मात्र विलीनीकरणाचे काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांना विचारला असता कर्मचारी या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जीवनवाहिनी पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्याने सर्व सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.