आता कॉल रेकॉर्ड करणे अवघड होणार; गुगलने आपल्या पॉलिसीमध्ये केले ‘हे’ बदल, जाणून घ्या…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल । अ‍ॅण्ड्राईड फोनवर कॉल रेकॉर्डिंग करणे अवघड होणार आहे. गुगलने नुकतेच आपल्या प्ले स्टोअर पॉलिसीला अपडेट केले आहे, त्यात त्यांनी अनेक बदल केले आहेत. 11 मे पासून ही नवीन पॉलिसी ग्राहकांसाठी लागू केली जाणार असून, यामुळे कॉल रेकॉर्डिंग करणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनवर मोठा प्रभाव पडणार आहे.

प्ले स्टोअरच्या नव्या पॉलिसीमध्ये होणार बदल

रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी ऍक्सेसिबिलिटी API ची विनंती केली जाऊ शकत नाही, याचा अर्थ अ‍ॅ​​​​​​प्सना कॉल रेकॉर्ड करण्याची परवानगी दिली जाणार नाही. Truecaller, Automatic Call Recorder, Cube ACR आणि इतर लोकप्रिय अ‍ॅप्स रेकॉर्डिंग करु शकणार नाहीत.

बाय-डिफॉल्ट रेकॉर्डिंग फिचर असेल तर करता येईल कॉल रेकॉर्डिंग

​​​​​​​जर तुमच्या अ‍ॅण्ड्राईड स्मार्टफोनमध्ये बायडिफॉल्ट रेकॉर्डिंग फिचर आहे, तरच तुम्ही कॉल रेकॉर्डिग करु शकता, गुगलने खुलासा केला आहे की, प्री-लोडेड कॉल रिकॉर्डिंग अ‍ॅप्स फिचर्ससाठी अ‍ॅक्सेसिबिलीटी परवानगीची आवश्यकता नाही.

शाओमीचा फोन वापरणाऱ्यांना अडचण नाही

आतापर्यंत गुगलच्या पिक्सल आणि शाओमी फोनमध्ये डायरल फिचरवर बाय डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग सुविधा देण्यात येते. त्यामुळे जर तुमच्याकडे शाओमी आणि पिक्सेल फोन असेल तर कॉल रेकॉर्डिंग करताना तुम्हाला अडचण येणार नाही.

परवानगी शिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे गुन्हा

एक बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलक्सी A12, रिअलमी C25, ओप्पो K10, वनप्लस यासारख्या अनेक फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची फिचर डायरलवर देण्यात येतो. मात्र, एखाद्याच्या परवानगी शिवाय कॉल रेकॉर्डिंग करणे हा गुन्हा आहे. मात्र, काही ठिकाणी जसे की कस्टमर केअरला कॉल रेकॉर्डिंग करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला अगोदरच सुचना देण्यात येते की, तुमचा कॉल रेकॉर्डिंग केला जात आहे.

युरोपमध्ये फोन कॉल रेकॉर्ड करणे बेकायदेशीर

जर आपण एखाद्या व्यक्तीची कॉल रेकॉर्डिंग त्याला न सांगता करत आहात, तर ही धोकादायक असू शकतो, त्यामुळे युरोपमध्ये कॉल रेकॉर्डिंग करने हा गुन्हा आदेश आहे. येथे भारताप्रमाणे शाओमी आणि पिक्सलच्या फोनमध्ये देखील रेकॉर्डिंग होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *